Saturday, 28 May 2011

खरे सांगा तुम्हाला पावसाळा किती आवडतो ?

वाटल नव्हत हृदय तुटलं तर
 इतक दु:ख सोसाव लागेल, 
 आजपर्यंत श्वासांनी मला  ,
 पण यापुढे पोसावं लागेल ,

 तुझ्या आठवणीच्या साखरझोपेत ,
 माझी कालची रात्र गोडव्यात सरली,
 पूर्वी स्वप्नांच्या जत्रेत मन जायचं ,
 पण 
 काल स्वप्नांनीच मनात जत्रा भरली !

 प्रेम........ शब्द दोन अक्षरांचा 
 नुसता ऐकला तर हर्ष होतो ,
 आणि उच्चारला तर ,,,,,
 दोन ओठांमध्ये स्पर्श होतो .......
  
 तुझ्या डोळ्यातील इवलासा अश्रू 
 भला साम्द्राहून खोल वाटला .......
 कारण मीच होतो म्हणून ,,,,,
 माझ्या डोळ्यात समुद्र दाटला  !

 माझ दुख बघवल नाही म्हणून ....
 म्हणून एक ढग रडत होता ........

तुमच आणि आमच काहीतरीच 
 म्हणे 
 तेंव्हा पाऊस रडत होता  !


 रात्री वारा सुटलेला  
 आणि पाऊस पडत होता !
 सहज वर पहिलो तर ......
 चक्क चंद्रच रडत होता ...........!

 पाऊस पडत असताना , 
 मातीचा सुगंध ...
 आणि गार - गार  वारा .............
 मला नेहमीच आवडतात झेलायला ,
 मुसळधार पाउसाच्या
त्या बरसणाऱ्या धारा ..............!

 मन होई फुलांचे थवे,,,
 गंध हे नवे कुठूनशी येती 
 मन पाउल- पाउल 
 स्वप्ने ओली हुळहूळनारी माती 
 मन वार्या वरती झुलते 
 असे उंच उंच का उडते 
 मग कोण पाहून भुलते .....
 सारे कळत नकळत घडते ...
 सारे कळत नकळत घडते............! 


1 comment: