प्रत्येक क्षणामध्ये काहीतरी आपले असते |
विरह जरी आले तरी , मिलनात गोडवा असतो |
ग्रीष्मात जरी उकडलो तरी ..........
पहिल्या पाऊसात गारवा असतो ||
पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं ,
हातातली कामं टाकून देऊन ,
पाऊसात जाऊन भिजायचं !
आपल्या अंगावर झेलून घ्यायचा ,
कोसळणाऱ्या धारा ,
श्वासामध्ये भरून घ्यायचा ,
सळसळ नारा वारा !
कानामध्ये साठून घ्यायचे गडगडणारे मेघ ,
डोळ्यामध्ये भरून घ्यायची सौदामिनीची रेघ !
पाऊस बरोबर पाऊस बनून ,
नाच नाचायचं अंगणामध्ये , मन होईपर्यंत ,
तळ होऊन साचायचं !
पाऊस पडतो तेंव्हा एकच कामं करायचं !!
आपल अस वागण बघून
लोक आपल्याला हसतील ,
आपला स्क्रू ढिला झाला म्हणून ,
अस सुद्धा म्हणतील ,
ज्यांना हसायचं त्यांना हसू द्या ,
ज्यांना काय काय म्हणायचं ते म्हणू द्या !
असल्या चिल्लर गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करायचं !
पहिला पाऊस मात्र एकदाच येतो ,,
एवढ मात्र लक्षात ठेवायचं ...........
म्हणून पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच
कामं करायचं
हातातली कामं टाकून देऊन ..........
पहिले प्रेम ............
पहिली भेट ...............
पहिला पाऊस ...................
पहिला स्पर्श ........................
पहिली मिठी ................................
मला आवडेल तुझ्या बरोबर असे पाऊसात भिजायला
तुला आवडेल ना ..............
तुजाच शोध घेतोय ....................
तू कधी भेटशील का ?


Read and Reply please thank you
ReplyDelete