Monday, 4 July 2011

ती आणि पाऊस - SHI & RAIN'S

शाळेत असताना ठीक होते , 
 वय थोडे लहान होते , 


भिजायला आवडायचे , नंतर मार खाऊनही.
 दुसर्या दिवशीही तोच क्रम  दररोज तोच पराक्रम 
शाळा संपली आणि कॉलेजला गेलो पहिल्या वर्षीच नापास झालो
कॉलेज थोडे दूर होते मित्र हि भरपूर होते 
MALLHARI KUTMULGE
तिची आणि  माझी ओळख  तशी पाऊसातीलच !
 पाऊस जरा थांबला होता पाण्याने रस्ता भरला होता 
काल चिखल रस्त्याची दृष्ट  काढीत होता 
 छत्र्यांचे इंद्रधनुष्य सौंदर्य खुलावीत  होता 
 ती येत होती आणि मैत्रीणीना सांगत होती 
 मैत्रिणी तिला समजावत होत्या , 
बहुदा हळू हळू चालत होत्या  ती जवळ आली मोगरा पसरला ,,,
आमची नजर नजर झाली  आणि तिचा पाय घसरला ,
मी तिला हलकेच झेलालो  सर्व गप्पच राहिले 
 कुणी बोलले नव्हते कुणी चालले नव्हते  सारे जणू स्थिरावले होते ,
ती माझ्या खुशीमध्ये होती , तो क्षण थांबला होता ,
चेहऱ्यावर निसर्ग खुलला होता ! एक मादक गंध पसरला होता !!!!!!!!!
दोघांचे डोळे स्थिरावले , एकमेकांना पाहत राहिलो !
फक्त श्वासाचाच आवाज येत होता , आणि वारा त्याला साथ देत होता !
आपले मित्रच खरे शत्रू असतात , विनाकारण मध्येच बोलत असतात !
कुणीतरी हाक मारली तिला , लगेच ती शुद्धीत आली !
तिने स्वारी म्हंटले आणि मीही ओके म्हंटल 
मी उभाच होतो , ती माघे पाहत जात होती 
ती परत फिरून आली 
माझे नाव .................... मला शुद्धी नव्हती 
तिच्या डोळ्या खेरीज दुसरीकडे नजर नव्हती 
ती गेली आणि प्रियसी होऊन परत आली !!!!!!
तेवढ्यात आईने हाक मारली मग , पुन्हा डोळे उघडून पाहिलं 
सकाळ झालेली होती

जमत तितक भिजून बघा

MALLHARI
  माझ्या मित्रानो तुम्हाला थोडस सांगाव वाटतय कि , संसारातल्या तारा मोठ्या नाजूक असतात. तालाची एक मात्रा चुककी तरी त्या नाराज होतात, सूर बेसूर होतात. म्हणूनच संसाराचं गाणं गाताना फ़ार जपावं लागतं-स्वत:लाही आणि इतरांनाही ! जीवन सुंदर व यशस्वी होण्यासाठी तीन गुणांची जरुरी असते. पहिला गुण म्हणजे मनात सर्वांविषयी प्रेम पाहिजे. दुसरा गुण म्हणजे ज्ञान पाहिजे आणि तिसरा गुण म्हणजे काम करण्यासाठी शक्ती पाहिजे.असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात. तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते, त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो शूर असल्याने त्याला कशाचीही पर्वा भीती नसते.
पुस्तकात लिहिले आहे की नियम तोडू नये,
उद्यानात लिहिले आहे की फुल तोडू
नये,
पण सगळ्यात महत्त्वाचे तर हृदय आहे
तेव्हा कोणी का नाही लिहिले की,
कोणाचे हृदय तोडु नये!!!
सुख आणि दुखाच्या होडीतून असे दूरवर तरंगताना ,
मध्येच भान यावे आणि पाहावे तर पाऊस ,
हा कधी आला असेल ; म्हणावे हसून ......
 मागे रोलून डोळे मिटून .......
मग आठवावी आपली एखादी गोष्ट !!
MALHARI KUTMULGE

Saturday, 28 May 2011

खरे सांगा तुम्हाला पावसाळा किती आवडतो ?

वाटल नव्हत हृदय तुटलं तर
 इतक दु:ख सोसाव लागेल, 
 आजपर्यंत श्वासांनी मला  ,
 पण यापुढे पोसावं लागेल ,

 तुझ्या आठवणीच्या साखरझोपेत ,
 माझी कालची रात्र गोडव्यात सरली,
 पूर्वी स्वप्नांच्या जत्रेत मन जायचं ,
 पण 
 काल स्वप्नांनीच मनात जत्रा भरली !

 प्रेम........ शब्द दोन अक्षरांचा 
 नुसता ऐकला तर हर्ष होतो ,
 आणि उच्चारला तर ,,,,,
 दोन ओठांमध्ये स्पर्श होतो .......
  
 तुझ्या डोळ्यातील इवलासा अश्रू 
 भला साम्द्राहून खोल वाटला .......
 कारण मीच होतो म्हणून ,,,,,
 माझ्या डोळ्यात समुद्र दाटला  !

 माझ दुख बघवल नाही म्हणून ....
 म्हणून एक ढग रडत होता ........

तुमच आणि आमच काहीतरीच 
 म्हणे 
 तेंव्हा पाऊस रडत होता  !


 रात्री वारा सुटलेला  
 आणि पाऊस पडत होता !
 सहज वर पहिलो तर ......
 चक्क चंद्रच रडत होता ...........!

 पाऊस पडत असताना , 
 मातीचा सुगंध ...
 आणि गार - गार  वारा .............
 मला नेहमीच आवडतात झेलायला ,
 मुसळधार पाउसाच्या
त्या बरसणाऱ्या धारा ..............!

 मन होई फुलांचे थवे,,,
 गंध हे नवे कुठूनशी येती 
 मन पाउल- पाउल 
 स्वप्ने ओली हुळहूळनारी माती 
 मन वार्या वरती झुलते 
 असे उंच उंच का उडते 
 मग कोण पाहून भुलते .....
 सारे कळत नकळत घडते ...
 सारे कळत नकळत घडते............! 


Thursday, 26 May 2011

" पाऊस पडतो तेंव्हा एकच काम करायचं "

प्रत्येक क्षणामध्ये काहीतरी आपले असते |
MALLHARI 
दु:खात जरी रडलो तरी , सुखात हास्य असते ||

विरह जरी आले तरी , मिलनात गोडवा असतो | 
ग्रीष्मात जरी उकडलो तरी  ..........

पहिल्या पाऊसात गारवा असतो || 


पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं  ,
हातातली कामं टाकून देऊन ,
पाऊसात जाऊन भिजायचं !

आपल्या अंगावर झेलून घ्यायचा ,
कोसळणाऱ्या धारा  ,
श्वासामध्ये भरून घ्यायचा ,
सळसळ नारा वारा  !

कानामध्ये साठून घ्यायचे गडगडणारे मेघ ,
डोळ्यामध्ये भरून घ्यायची सौदामिनीची रेघ  !

पाऊस बरोबर पाऊस बनून ,
नाच नाचायचं अंगणामध्ये , मन होईपर्यंत ,
तळ  होऊन साचायचं  !

पाऊस पडतो तेंव्हा एकच कामं करायचं !!

आपल अस वागण बघून 
लोक आपल्याला हसतील ,
आपला स्क्रू ढिला झाला म्हणून ,
अस सुद्धा म्हणतील , 
ज्यांना हसायचं त्यांना हसू द्या ,
ज्यांना काय काय म्हणायचं  ते म्हणू द्या !

असल्या चिल्लर गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करायचं !
पहिला पाऊस मात्र एकदाच येतो ,,
एवढ मात्र लक्षात ठेवायचं ...........

म्हणून  पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच 
कामं करायचं 
हातातली कामं टाकून देऊन ..........
पाऊसात जाऊन भिजायचं .........................




पहिले प्रेम ............
पहिली भेट ...............
पहिला पाऊस ...................
पहिला स्पर्श ........................
पहिली मिठी ................................
मला आवडेल तुझ्या बरोबर असे पाऊसात भिजायला 
तुला आवडेल ना ..............
तुजाच शोध घेतोय ....................
तू कधी भेटशील का ?